Home Accident News अहमदनगर: कंटेनरचे चाक अंगावरून गेले; माजी नगरसेवकाचा मृत्यू

अहमदनगर: कंटेनरचे चाक अंगावरून गेले; माजी नगरसेवकाचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: कंटेनरखाली सापडून माजी नगरसेवक, प्रतिष्ठीत सुराणा (वय ७३) यांचा अपघातात मृत्यू.

wheel of the container went off Death of Ex-Corporator

राहुरी : नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतूक कोंडीने राहुरी शहराचा श्वास गुदमरत असतानाच कंटेनरखाली सापडून माजी नगरसेवक, प्रतिष्ठीत फटका तसेच कुंदनमल सुराणा (वय ७३) यांचा अपघातात मृत्यू झाला.

बसस्थानक समोर नगर मनमाड राज्य महामार्गावर शनिवारी (दि.१८) सायंकाळी झालेल्या अपघातात शहरातील प्रतिष्ठित व्यापारी कुंदनमल सुराणा हे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती समजताच शहरातील नागरिकांनी वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत संताप व्यक्त केला. राहुरी नगरपरिषदचे माजी नगर- सेवक तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यापारी कुंदनमल मानकचंद सुराणा (रा. गोकुळ कॉलनी) हे सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान मोटारसायकलने घराकडे जात होते. बस स्थानकासमोरच कंटनेरच्या चाकाखाली ते सापडले. कंटेनरचे चाक अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेत कुंदनमल सुराणा यांचा मृतदेह रुग्णालयात नेला. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, संतोषकुमार लोढा, जितेंद्र लुक्कड, गौरव झंवर, महेंद्र मुथ्या, अनिल भट्टड, कल्पेश सावज, स्वप्नील दरक, आरपीआयचे सुनिल चांदणे, अरुण साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कुंदनमल सुराणा यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे, तीन भाऊ असा परिवार आहे.

Web Title: wheel of the container went off Death of Ex-Corporator

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here