Home जळगाव मामाच्या मुलीसाठी सख्ख्या भावांत हाणामारी, तिचं प्रेम तिसऱ्यावरच

मामाच्या मुलीसाठी सख्ख्या भावांत हाणामारी, तिचं प्रेम तिसऱ्यावरच

Breaking News | Jalgaon: दोघांपैकी कुणाशीच आपल्याला लग्न करायचे नाही. आपले गल्लीतील एका तरुणावर प्रेम (Love).

uncle's daughter, many brothers clash, her love is only for the third one

जळगाव:  मुलगी पाहण्यासाठी आईसोबत दोन्ही तरुण मुले मामाकडे आली. मुलगी पसंत पडल्याने मोठ्या मुलाने होकार दिला; पण लहान भावालादेखील मुलगी पसंत असल्याने त्याने चक्क तिच्यासोबतच लग्नाची इच्छा व्यक्त केली. यावरून सख्ख्या भावांत हाणामारी झाली. शेवटी मुलीने आपले गल्लीतील एका मुलावर प्रेम असल्याचे सांगत सर्वांना धक्काच दिला. ही घटना शनिवारी जामनेरात घडली. दोघा भावांमधील वाद कपडे फाडण्यापर्यंत वाढल्याने पोलिस ठाण्यात पोहोचला होता.

बाहेरच्या राज्यातील रहिवासी असलेली बहीण शनिवारी जामनेरातील आपल्या भावाकडे मुलगी पाहण्यासाठी आली. सोबत तिची दोन तरुण मुलेही होती. बहिणीने मोठ्या मुलासाठी भावाकडे मुलीची मागणी घातली. मोठ्या मुलाला मुलगी पसंत पडली. इकडे लहान मुलाने आपणासही मामाची मुलगी पसंत असल्याचे सांगत तिच्याशी लग्न करायचा हट्ट धरला. यावेळी उपस्थित नातेवाइकांनी लहान भावाला समजावले; पण तो हट्टालाच पेटला.

लहान भावाची केली कपडे फाटेपर्यंत धुलाई

दोन्ही भावांत वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मोठ्या भावाने लहान्याची कपडे फाटेपर्यंत धुलाई केली. फाटलेल्या कपड्यांतच त्याने जामनेर पोलिस स्टेशन गाठले, त्याची समजूत काढत घरी आणले.

ती म्हणाली, गल्लीतील मुलासोबत लग्न करणार!

इकडे मुलीने मात्र दोघांपैकी कुणाशीच आपल्याला लग्न करायचे नाही. आपले गल्लीतील एका तरुणावर प्रेम आहे. त्याच्याशी मी लग्न करणार असल्याचे सांगत सर्वांनाच धक्काच दिला. मुलीचा निर्णय ऐकून पाहुणी म्हणून आलेली बहीण दोघा मुलांसोबत आपल्या गावाकडे रवाना झाली.

Web Title: uncle’s daughter, many brothers clash, her love is only for the third one

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here