Home अकोले अकोले: पोलीस पाटीलच्या घराला आग लागून भस्मसात

अकोले: पोलीस पाटीलच्या घराला आग लागून भस्मसात

Breaking News | Akole: अचानक आग (Fire) लागल्याने एकच ओरड.

Police Patil's house gutted by fire

अकोले: तालुक्यातील टिटवी येथील पोलिस पाटील प्रकाश खंडू मुंढे यांच्या घराला काल रात्री आग लागून मोठे नुकसान झाले. जीवित हानी झाली नाही. अचानक आग लागल्याने एकच ओरड झाला. टिटवी ग्रामस्थांची धावपळ उडाली; मात्र रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आली. सर्व साहित्य बेचिराख झाले होते. ग्रामस्थांच्या मदतीमुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच आज टिटवी येथे राष्ट्रवादी युवा जिल्हा अध्यक्ष अमित भांगरे यांनी पोलिस पाटलांची भेट घेतली. नुकसानीची पाहणी केली. घरातील किराणा दुकानाचे साहित्य, रोख रकमेसह मोठे नुकसान प्रथमदर्शनी निदर्शनास आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शासकीय मदत मिळवून देण्यासाठी मी कटिबध्द राहील, असे भांगरे यांनी सांगितले. यावेळी सरपंच तुकाराम वायळ, उपसरपंच बाळू बोबडे, कुशाबा धांडे, राजूरचे पोलिस उपस्थित होते.

Web Title: Police Patil’s house gutted by fire

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here