Home पुणे पार्टी करून मध्यरात्री घरी निघालेल्या तरुण-तरुणीचा कारच्या धडकेत मृत्यू

पार्टी करून मध्यरात्री घरी निघालेल्या तरुण-तरुणीचा कारच्या धडकेत मृत्यू

Breaking News | Pune Car Accident: मध्यरात्री पार्टी करुन तरुण आणि तरुणी दुचाकीवरून घरी जात होते.  या तरुण आणि तरुणीच्या दुचाकीला बेभान कार चालकाने दिलेल्या जोरदार धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.

midnight after partying died in a car collision

पुणे: शहरातील कल्याणीनगर भागातील एका पबमधून शनिवारी मध्यरात्री पार्टी करुन तरुण आणि तरुणी दुचाकीवरून घरी जात होते. मात्र या तरुण आणि तरुणीच्या दुचाकीला बेभान कार चालकाने दिलेल्या जोरदार धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा कारच्या धडकेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.  कार चालक आरोपी हा अल्पवयीन १७ वर्षीय आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथील एका हॉटेलमधून अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघे जण शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पार्टी करून दुचाकीवरून घरी निघाले होते. हॉटेलपासून काही अंतर पुढे आल्यावर लॅन्डमार्क सोसायटी जवळ ग्रे कलरच्या दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या पोर्शे कारने (एम.एच. १४ सी क्यु ३६२२) बजाज पल्सरवरून जात असलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत दोघे जण रस्त्याच्या बाजूला पडले. या दोघांच्या डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: young man and woman who were going home at midnight after partying died in a car collision

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here