Home पुणे ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

Breaking News | Pune Crime: दोन अल्पवयीन मुलींना फिरायला नेण्याच्या बहाण्याने एका लॉजवर नेऊन ड्रग्स आणि दारू पाजून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना.

After drinking alcohol with drugs, they took it to the lodge and made a scandal Both were raped

पुणे: दोन अल्पवयीन मुलींना फिरायला नेण्याच्या बहाण्याने एका लॉजवर नेऊन ड्रग्स आणि दारू पाजून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.  पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे शुक्रवारी ही घटना घडली आहे. या प्रकरणी ड्रग्ज देणारा आणि बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय भिकेन दौड (वय २९, रा. सातकरस्थळ, ता. खेड), श्रीराम संतोष होले, (वय २३, रा. होलेवाडी, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन अल्पवयीन पीडितांना फिरायला नेण्याच्या बहाण्याने एका डोंगरावर घेऊन गेले. यावेळी त्यांनी किरण नामक तिसऱ्या आरोपीकडून ड्रग्स घेतले. दोघींना ड्रग्सचे इंजेक्शन आणि दारू पिण्याचा आग्रहत्यांनी धरला. त्यांनी नकार दिला असता तुम्हाला इथेच सोडून जाऊ अशी धमकी त्यांनी दिली. यानंतर त्यांना इंजेक्शनच्या साह्याने आधी ड्रग्स देऊन आणि नंतर त्यांना दारू पाजली. दोघीही नशेत असतांना आरोपींनी त्यांना लॉजवर लेले. त्या ठिकाणी त्यांनी दोघींवर बलात्कार केला. दरम्यान, पीडित मुली या घरी नशेतअसलेल्या अवस्थेत पोहचल्यावर घरच्यांना धक्का बसला. त्यांनी त्यांची चौकशी केली असता हा प्रकार पुढे आला. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मुलींच्या पालकांनी या प्रकरणी राजगुरूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. राजगुरुनगर पोलीसांकडून दोघांना अटक केली असून ड्रग्स देणारा तिसरा आरोपी फरार झाला आहे.

Web Title: After drinking alcohol with drugs, they took it to the lodge and made a scandal Both were raped

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here