पिचड ठरवतील तोच आमचा पक्ष मुस्लिम तरुणांनी जाहीर केली भूमिका
अकोले: आम्ही पक्ष म्हणून नाही तर मधुकर पिचड यांच्यासाठी वैभव पिचड यांच्या पाठीशी आहोत. पिचड व सीताराम गायकर यांनी पिंपळगाव खांडचे पाणी दिल्याने आमच्या परिसरात दुष्काळाची चिंता मिटली आहे. चाळीस वर्ष पिचड यांनी आम्हाला न्याय्यच दिला आहे. म्हणून आम्ही पिचड सांगतील त्या भूमिकेसोबत आहोत अशी भावना मुस्लीम समाजाच्या तरुणानी व्यक्त केली.
मधुकर पिचड हाच आमचा पक्ष आहे असे मत यावेळी जेष्ठ कार्यकर्ते आझाद सय्यद यांनी मांडले. मंगळवारी मुस्लीम समाजातील तरुणांनाची बैठक झाली. यावेळी माजी मंत्री मधुकर यांची उपस्थिती होती.
या बैठकीत एक विचाराने पिचडांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. पिचड म्हणाले तुम्ही घेतलेला निर्णय राज्यात आदर्श ठरेल. तुम्ही दिलेली साथ मी विसरणार नाही.
यावेळी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, रमेश देशमुख, आझाद सय्यद, एजाज शेख, इम्रान अत्तार, सुलतान इनामदार, रफिक शेख, राज काझी, रियाज तांबोळी, रिजवान सय्यद आदी उपस्थित होते.
Website Title: Latest News Akole Pichad hach Paksh

















































