Home अकोले आम्ही रडणारे नाही तर लढणारे: पिचड

आम्ही रडणारे नाही तर लढणारे: पिचड

अकोले: आम्ही कायम समाजासाठी लढलो. वेगवेगळ्या प्रश्नांसाठी वेळप्रसंगी आदिवासी समाजाच्या हितासाठी आम्हाला मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र रडन्यासारखे आम्ही कधी वागलो नाही आणि वागणारही नाही. जनतेच्या हक्कासाठी आजपर्यंत लढलो भविष्यातही लढणार असा विश्वास माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केला.

विधानसभेचे महायुतीचे उमेदवार माजी आमदार वैभव पिचड यांच्या सभेत पिचड बोलत होते. पिचड म्हणाले अकोले तालुक्यात ३५ वर्षात मोठ्या प्रमाणात धरणे, बंधारे, रस्ते, आरोग्य उप केंद्रे, आश्रमशाळा, अगस्ती कारखान्याची उभारणी केली. दुध संघाची निर्मिती करून दुधाला योग्य भाव देण्याचे काम केले. प्रवाहानुसार काळाची पावले ओळखून भाजपात प्रवेश केला. देश सुजलाम सुफलाम करण्याचे नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी साथ द्या असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी मधुकरराव नवले, सीताराम गायकर, गोरक्ष मालुंजकर, दशरथ सावंत, वसंतराव मनकर, बाबासाहेब हासे, भानुदास कासार, शिवाजी धुमाळ, विठ्ठलराव चासकर, अशोक देशमुख, विजय वाकचौरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.  

Website Title: Latest News Akole not weepers but fighters Pichad 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here