३ मे नंतर शिथिलता आणली जाईल: उध्दव ठाकरे
मुंबई: उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद साधत जनतेला दिलासादायक बातमी दिली आहे. पुणे, मुंबई, ठाणे, औरंगाबाद याठिकाणी निर्बंध कायम राहणार असून ग्रीन झोनमध्ये ३ तारखेनंतर अधिक मोकळीक देणार आहोत. ३ मे नंतर शिथिलता आणली जाईल. अंशतः सूट दिली जाईल. मात्र झुंबड उडाली तर पुन्हा बंधने आणली जातील.
रेड झोनवगळता इतर ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत असल्याचं सांगत राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला. सुरुवातीलाच त्यांनी १ मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. राज्यातील लॉकडाऊनची मुदत येत्या ३ मे रोजी संपत आहे. त्यामुळे पुढे काय होणार असा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर आदी जिल्हे राज्यातील रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे ३ मे नंतर या ठिकाणी शिथिलता देणं योग्य ठरणार नाही. मात्र, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येईल.
प्रत्येक देशाचा नागरिक हीच देशाची खरी संपती आहे. तुम्ही सर्वजण देशाची संपती आहात. तुम्ही आत्तापर्यंत जशी साथ दिली तशीच अजून पुढेही द्या असेही आवाहन ठाकरे यांनी केले आहे.
लॉकडाउनमध्ये शेतीवर बंधने कोणतेही बंधने नाहीत. बी बियाणे खते यावर कोणतेही बंधने नाहीत. कृषी माल वाहतुकीवर बंधने नाहीत असे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, हे करीत असताना झुंबड केली, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळली नाहीत तर बंधने टाकावी लागतील असा इशारा त्यांनी दिला.
Website Title: latest News uddhav thakare communication

















































