अकोले तालुक्यातील रहिवासी, नाशिक येथे स्थायिक जोडपे करोनाबाधित, १७ जण होमक्वारंटाईन
अकोले: तालुक्यातील माळीझाप येथे रहिवासी व सध्या नाशिकमध्ये स्थायीक असलेल्या एका जोडप्यास करोना झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हा करोना बाधित रुग्ण तरुण हा नाशिक ग्रामीण पोलीस दलात असून त्यांच्या पत्नीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आल्याचे निदर्शनास आले आहे.
विशेष बाब म्हणजे हा पोलीस कर्मचारी त्यांच्या भाचीच्या संपर्कात आल्याने तिच्या कुटूंबास नगर जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे व घरातील १७ जणांना आरोग्य विभागाने होमक्वारंटाईन केले आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, माळीझाप परिसरात एक तरुण गेल्या काही वर्षापासून पोलीस दलात कार्यरत आहे. त्याची ड्युटी मालेगाव येथे लावण्यात आली होती.
विशेष म्हणजे तो आजारी पडला तरी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. मात्र दि. २२ एप्रिल रोजी त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर २३ एप्रिल रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर सगळी धांदल उडाली. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या पत्नीस तपासले असता त्यांचा देखील रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. हा प्रकार गेला आठवडाभर गुपित राहिला.
मात्र, आज १ मे रोजी त्यांच्या सानिध्यात असलेली त्याची भाची आजारी पडल्याने त्यांनी सावध भूमिका घेत अकोले आरोग्य विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर आरोग्य विभागाने तत्काळ तीन जणांना ताब्यात घेऊन आज दुपारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
अर्थात घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. कारण, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून त्यामुळे सर्दी खोकला होऊ शकतो.
मात्र, कोणतीही धोका नको म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. तर, संंबंधित पोलीस कर्मचारी हे त्यांच्या घरी देखील आले होते. त्यामुळे, या सर्वांचे नमुने घेतले असून म्हाळादेवी केंद्राच्या अंतर्गत त्या कुटूंबातील १७ जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.
Website Title: Coronavirus News akole residential Suspicious