Home अकोले पाहून व्हाल थक्क, अकोले तालुक्यात बिबट्याचा बछडा

पाहून व्हाल थक्क, अकोले तालुक्यात बिबट्याचा बछडा

अकोले: अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथे शेतात दीड महिन्याचा बछडा आढळला आहे. धामणगाव आवारी येथे शेतकरी बाळासाहेब आत्माराम पापळ हे शनिवारी पाणी भरत असताना त्यांना मकाच्या पिकात दीड महिन्याचा बिबट्या आढळला आहे.

बिबट्याच्या बछडाला पाहताच बाळासाहेब पापळ हे सुरुवातीला डचकले. त्यांनतर मात्र त्यांनी आपल्या खिशातील मोबाईल काढून त्या बछडाची छायाचित्र टिपली. दोन दिवसांअगोदर पापळ हे मका शेत्तात पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्याची डरकाळीचा आवाज ऐकू आला होता. त्यानंतर ते दोन दिवस फिरकले नाही. मात्र शनिवारी ते मकाला पाणी भरण्यासाठी गेले असता अचानक बछडा आढळून आला. या भागात बछडा ची आई बिबट्या मादी असू शकते बिबट्या मादी अधिक आक्रमक होऊ शकते या कारणामुळे त्यांनी तेथून पाय काढता घेतला असे पापळ यांनी सांगितले.

दरम्यान या घटनेची माहिती वनविभागाला कळविली आहे. तसेच नागरिकांकडून पिंजारा लावण्याची मागणी होत आहे. 

Website Title: Latest News Akole taluka bibatya found

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here