Home अकोले कळस मुलीची विषारी औषध घेऊन आत्महत्या

कळस मुलीची विषारी औषध घेऊन आत्महत्या

कळस: अकोले तालुक्यातील कळस येथील तरुण मुलीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिने का आत्महत्या केली यामागचे कारण समजू शकले नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कळस बुद्रुक येथे शेतमजुरी करणाऱ्या मजुराच्या २२ वर्षाच्या मुलीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. पुष्पा जिजाबा पोकळे हे कळस येथे शेती बटाइने आणि मजुरीने करत आपली आणि कुटुंबाची गुजराण करतात. बुधवारी सकाळी ११ वाजता सदर मयत तरुणीने विषारी औषध घेतल्याचे समजले. त्यानंतर तिला अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी शवविचेदन करून मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला. तिने आत्महत्या का केली यामागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.  

Website Title: Latest News Kalas Girl commits suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here