Home अहमदनगर कार आणि दुचाकीच्या अपघातात पती पत्नी ठार

कार आणि दुचाकीच्या अपघातात पती पत्नी ठार

राहुरी: तालुक्यातील देवळाप्रवरा इरिगेशन बंगल्याजवळ झालेल्या कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात बिरोबावाडी येथील वाघ्या मुरळी जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली. अपघातानंतर कार चालक कार सोडून फरार झाला आहे.

या अपघाताबाबत माहिती अशी की, कार राहुरी कारखान्याकडून देवळालीच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती.याचवेळी वाघापुरे हे दाम्पत्य दवाखान्यात जाण्यासाठी मोटारसायकलवरून राहुरी कारखान्याकडे निघाले होते. दुपारी चार वाजता देवळाली इरिगेशन बंगला परिसरात या मोटारसायकलला जोराची धडक दिली. कारचा वेग इतका प्रचंड होता की, कारने दोघा पती पत्नीला दोनशे फुट फरफटत नेले. या अपघातात भारत शंकर वाघापुरे व अनिता भारत वाघापुरे हे दाम्पत्य जागीच ठार झाले. या अपघातानंतर कार चालक फरार झाला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Website Title: News Car and Bike Accident husband-wife death Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here