नात्याला काळीमा फासणारी घटना: १० वर्षीय नातीवर आजोबांनी केला अत्याचार
Beed Crime News: घरात कोणी नसताना १० वर्षीय चिमुकलीवर आजोबाने अत्याचार (abused) केल्याची घटना.
बीड: नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. घरात कोणी नसताना १० वर्षीय चिमुकलीवर आजोबाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अत्याचारी आजोबा फरार झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना समोर आली आहे. एका 62 वर्षीय आजोबाने त्याच्या 10 वर्षीय अल्पवयीन नातीवर अत्याचार केला. आई शेतात गेल्याचा गैरफायदा घेत आजोबाने घरात शिरून अल्पवयीन नातीवर अत्याचार केला गेला. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
पीडित चिमुकलीने घडलेली कहाणी आई घरी आल्यानंतर सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आईने दिंद्रुड पोलीस ठाणे गाठत मुलीसोबत घडलेली कैफियत मांडली. यावरून आरोपी नराधम आजोबावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
Web Title: A 10-year-old grandson was abused by his grandfather