Home Accident News संगमनेर: दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार, एक जखमी – Accident

संगमनेर: दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार, एक जखमी – Accident

Sangamner Accident News:  दोन दुचाकींच्या धडकेत झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला तर एक जण जखमी.

Sangamner Accident One killed, one injured in two-wheeler collision

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात दोन दुचाकींच्या धडकेत झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. युवकाच्या अपघाती मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे शिवारात हॉटेल आराध्या नजीक बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. तळेगाव दिघे शिवारातील हॉटेल आराध्या नजीक दोन दुचाकींची धडक होत अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार अमोल अशोक दिघे (वय 31 वर्ष, रा. तळेगाव दिघे) हा युवक जागीच ठार झाला. तर दुसरा दुचाकीस्वार अमोल निवृत्ती दिघे हा युवक जखमी झाला.

दरम्यान दोघाही युवकांना संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र तत्पूर्वीच अमोल अशोक दिघे या युवकाचा मृत्यू झाला होता. अमोल अशोक दिघे या युवकाच्या अपघाती मृत्यूने तळेगाव दिघे गावावर शोककळा पसरली असून गुरुवारी दुपारी शोकाकुल वातावरणात त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताचा अधिक तपास संगमनेर तालुका पोलीस करीत आहेत.

Web Title: Sangamner Accident One killed, one injured in two-wheeler collision

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here