Home औरंगाबाद धक्कादायक! 14 वर्षीय मुलीवर तब्बल 50 वेळा सामुहिक अत्याचार

धक्कादायक! 14 वर्षीय मुलीवर तब्बल 50 वेळा सामुहिक अत्याचार

Crime News:   १४ वर्षीय मुलीला बळजबरीने दारु पाजून डोंगर परिसरात तिच्यावर अत्याचार (gang raped) केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील सहा आरोपींपैकी तिघांना सातारा पोलिसांनी अटक केली.

A 14-year-old girl was gang raped 50 times

छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील एका १४ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचे प्रकरण राज्यभर गाजले. या गुन्ह्यातील काही आरोपींना अटकही करण्यात आली, तर सहा जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी पीडितेवर तब्बल ५० वेळा अत्याचार झाल्‍याची धक्कादायक बाब समोर आली असून तपास अधिकाऱ्यांनी सदर माहिती न्यायालयात सादर केली आहे.

अक्षय प्रकाश चव्हाण (वय १९, रा. डोणगाव तांडा ता. पैठण), शेख बबलू शेख लतिफ ऊर्फ असीम पठाण (एचपी) (२४, रा. जमालनगर, देवळाई) आणि रामेश्वर अंबादास गायकवाड (२२, रा. अलोकनगर, बीड बायपास सातारा परिसर, मूळ रा. मानेगाव खालसा, रामनगर, जि. जालना) अशी अटकेतील आरोपींची नावे असून आरोपींच्या पोलिस कोठडीत १६ जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वैरागडे यांनी मंगळवारी (ता.१३) दिले.

पीडितेवर अत्याचार झालेल्या तीन ठिकाणचे पंचनामे करण्यात आले. गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांपैकी अक्षय चव्हाण याने वापरलेली इंडिका कार (एमएच २०, बीए ९१४१) डोणगाव (ता. पैठण) येथून हस्तगत करण्यात आली. त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच २०, ५२५) अल्पवयीन साथीदाराची असल्याचे अक्षयने सांगितले.

रामेश्वर गायकवाड याने दुचाकी (एमएच २०, ईएफ ५५०८) गुन्ह्यात वापरल्याची कबुली दिली मात्र ती कोठे ठेवली याची माहिती त्याने दिली नाही. याशिवाय आरोपी शेख बब्बू शेख लतीफ याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच २०, ९२५४) शेख हुसेन (रा. देवळाई) याच्याकडे असल्याचे पोलिसांना सांगितले.

१४ वर्षीय मुलीला बळजबरीने दारु पाजून डोंगर परिसरात तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील सहा आरोपींपैकी तिघांना सातारा पोलिसांनी अटक केली.

अक्षय प्रकाश चव्हाण (१९, रा. डोणगाव तांडा ता. पैठण), शेख बबलु शेख लतिफ उर्फ असीम पठाण (एचपी) (२४, रा. जमालनगर, देवळाई) आणि रामेश्वर अंबादास गायकवाड (२२, रा. अलोकनगर, बीड बायपास सातारा परिसर, मुळ रा. मानेगाव खालसा, रामनगर, जि. जालना) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

विशेष म्हणजे अटकेतील आरोपींचे मोबाइल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. प्रकरणात १४ वर्षीय पीडितेच्या फिर्यादीनुसार, मैत्रिणीने पीडितेची अल्पवयीन आरोपीसोबत ओळख करून दिली. त्याने दुसऱ्या एका तरुणाशी पीडितेची ओळख करून दिली. ते दोघेही पीडितेशी मोबाइलवरून बोलायचे.

ऑक्टोबर २०२२ मध्ये अल्पवयीन मुलाने पहाटे दोनला पीडितेला कॉल केला. तिला घराबाहेर बोलावून घेतले. तेव्हा आरोपी अक्षय चव्हाण आणि अल्पवयीन मुलगा तेथे होते. त्यांनी पीडितेला साई टेकडी परिसरात नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनविला. अश्लील फोटो काढले.

पहाटे ५ वाजता तिला घरी आणून सोडले. त्यानंतर पुन्हा अल्पवयीन आरोपीने तिला धमकी देऊन साई टेकडी परिसरात नेले व तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. हा प्रकार तीन ते चारवेळा घडला.

मार्च-एप्रिल २०२३ मध्ये असीम पठाण (एचपी) याने अशाच प्रकारे पहाटे दीड वाजता फोन करून बोलावले आणि देवळाई रोडच्या बाजुला असलेल्या एका घरी नेऊन अत्याचार केला. दुसऱ्या वेळी त्याने त्याच्या मित्राला सोबत घेऊन दोघांनी अत्याचार केला. त्यानंतर राम गायकवाड याने आणि त्याच्या मित्राने बळजबरी अत्याचार केले.

त्यानंतर पुन्हा एकदा राम गायकवाड याने पीडितेवर अत्याचार केला. अल्पवयीन मुलांसह तब्बल सहा जणांनी पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केले. प्रकरणात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारी वकील बी. आर. लोया यांनी काम पाहिले.

Web Title: A 14-year-old girl was gang raped 50 times

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here