अहमदनगर: इंजिनियर तरुणाचा धरणात बुडून मृत्यू
Ahmednagar News: बहिरवाडी येथील अभियंता असलेल्या तरुणाचा पुणे येथील खडकवासला धरणात बुडून (drowned ) मृत्यू झाल्याची घटना.
नेवासा | Nevasa: नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील अभियंता असलेल्या तरुणाचा पुणे येथील खडकवासला धरणात बुडून मृत्यू झाला. राहुल भाऊसाहेब येवले (वय २३) असे मयताचे नाव आहे. रविवारी (दि.११) दुपारी ही घटना घडली.
राहुल हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. तो पुणे येथे एका कंपनीत नोकरीस होता. रविवारी सुटी असल्याने तो मित्रांसोबत खडकवासला येथील धरण परिसरात गेला होता. मात्र त्यास पोहता येत नसल्याने तो बाजूलाच बसून होता. नंतर कमी पाण्यात उतरला तेव्हा त्याचा पाय घसरून तोल गेल्याने तो वाहून गेला. इतर मित्रांनी आरडाओरड केली मात्र तो वाहत गेला. या घटनेची खबर राहुल याच्या मित्रांनी पोलिसांना कळवली. सोमवारी सायंकाळी राहुलचा मृतदेह पोलिसांना मिळून आला. राहुल याच्यावर मंगळवारी बहिरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Web Title: Young engineer drowned in the dam
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App