Home क्राईम प्रेमाला नकार दिल्याने 19 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर पेट्रोल टाकलं, अन…

प्रेमाला नकार दिल्याने 19 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर पेट्रोल टाकलं, अन…

Chandrapur Crime: प्रेमाला नकार दिल्याने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाने पेट्रोल  टाकल्याची धक्कादायक घटना (One side love) चंद्रपुरात  समोर, या घटनेने खळबळ उडाली आहे. 

19-year-old youth pours petrol on minor girl after refusing love

चंद्रपूर: प्रेमाला नकार दिल्याने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाने पेट्रोल  टाकल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात  घडली आहे. मुलीने प्रतिकार केल्याने आरोपीने पळ काढला आणि मुलगी बचावली. भद्रावती तालुक्यातील बेलगाव इथे सोमवारी (12 जून) संध्याकाळी ही घटना घडली.

एकतर्फी प्रेमातून  आरोपीने हे कृत्य केल्याचं समजतं. आरोपी तरुण आणि अल्पवयीन मुलगी एकाच परिसरात राहतात. आरोपीचे संबंधित अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. परंतु मुलीने त्याच्या प्रेमाला नकार दिल्याने आरोपी संतापला. रागाच्या भरात त्याने मुलीला जीवे मारण्याचं ठरवलं. ही मुलगी सोमवारी संध्याकाळी घरात एकटी असल्याचं आरोपीला समजलं. त्याने मुलीच्या घरात प्रवेश केला आणि तिच्या अंगावर पेट्रोल टाकलं. मात्र मुलीने प्रतिक्रार केल्याने आरोपीने तिथून पळ काढला आणि पुढील अनर्थ टळला.

हा सगळा प्रकार मुलीने आपल्या कुटुंबियांना सांगितला. यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी या प्रकरणी भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी सिद्धांत भेले या तरुणावर काल (13 जून) रात्री भादंवि कलम 307 अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली.

Web Title: 19-year-old youth pours petrol on minor girl after refusing love

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here