Home महाराष्ट्र घाटात गाय आडवी आली आणि कार दरीत कोसळली

घाटात गाय आडवी आली आणि कार दरीत कोसळली

घाटात दाट धुके असताना अचानक गाय आडवी आल्याने कार दरीत कोसळून (Accident) एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू.

cow overturned in the ghat and the car fell into the valley Accident

चिपळूण | रत्नागिरी: घाटात दाट धुके असताना अचानक गाय आडवी आल्याने कार दरीत कोसळून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. अन्य तिघे मात्र बालंबाल बचावले.

सुरेश लक्ष्मण कांबळे (७०, रा. शिराळा) असे मृताचे नाव आहे. कारचालक बाबासाहेब बाळू सुवासे (रा. सध्या दापोली, मूळ रा. कोल्हापूर) हे दापोली येथे समाजकल्याणच्या वसतिगृहात अधीक्षक म्हणून काम करतात. मंगळवारी सकाळी ते आपल्या कारने एकटेच गावी कोल्हापूरकडे निघाले होते. बहादूर शेख – चिपळूण येथे त्यांना तिघा प्रवाशांनी आम्हाला इस्लामपूरला सोडा, अशी विनंती केली. त्यांना कारमध्ये घेऊन सुवासे मार्गस्थ झाले. महामार्गावर पावसामुळे धुक्याचे वातावरण होते. पोफळी येथील लीला हॉटेलच्या पुढे साधारण दोन किलोमीटर अंतरावर कार घाट चढत असताना अचानक एक गाय समोर आल्याने सुवासे यांनी कार उजव्या बाजूला घेतली असता उलटली. दरीतील एका चरात कार अडकून अपघात झाला.

Web Title: cow overturned in the ghat and the car fell into the valley Accident

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here