Home संगमनेर संगमनेर: सामाईक विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह

संगमनेर: सामाईक विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह

Sangamner News:  संगमनेर: देवळात जाऊन येते  असे सांगून गेलेल्या ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह सामाईक विहिरीमध्ये आढळून आला.

woman's Dead body was found in a common well

संगमनेर: देवळात जाऊन येते  असे सांगून गेलेल्या ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह सामाईक विहिरीमध्ये आढळून आला. ही घटना सोमवारी (दि. १२) दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास गव्हाळी, साकूर येथे घडली. याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विद्या नयन पेंडभाजे (वय ३५, रा. साकूर, ता. संगमनेर) असे मयत महिलेचे नाव आहे. तिच्या मृत्यूप्रकरणी किरण भाऊसाहेब पेंडभाजे (वय २८, रा. साकूर, ता. संगमनेर) यांनी  दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली

आहे. सोमवार असल्याने देवळात जाऊन येते, असे सांगून विद्या पेंडभाजे गेल्या होत्या. त्यानंतर त्यांचा मृतदेह सामाईक विहिरीत आढळून आला. याबाबत सहायक फौजदार ए. आर. गांधले अधिक तपास करीत आहेत.

Web Title: woman’s Dead body was found in a common well

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here