Home Accident News उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून 3 वर्षांचा मुलगा ठार

उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून 3 वर्षांचा मुलगा ठार

Satara News: उसाच्या फडात उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून तीन वर्षांचा मुलगा ठार (dead ) झाल्याची घटना. ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल.

A 3-year-old boy was found dead under a sugarcane tractor

सातारा: सातारा- कोरेगाव रस्त्याकडेला ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) गावाच्या हद्दीतील घोल नावाच्या शिवारात उसाच्या फडात उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून तीन वर्षांचा मुलगा ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे ल्हासुर्णेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, , ल्हासुर्णे गावच्या हद्दीत लक्ष्मण दशरथ संकपाळ यांच्या शेतातील तोडलेला ऊस सागर शिवाजी राठोड (रा. अल्हनवाडी, ता. पाथर्डी, जि. नगर) हा ट्रॅक्टरमध्ये (एमएच- 23 बीसी- 5623) भरून रस्त्याकडे निघाला होता. त्या वेळी ट्रॅक्टरच्या डाव्या चाकाखाली अचानक संकेत कृष्णा जाधव (वय- 3) हा मुलगा आल्याने तो चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाला. त्याच्या तोंडातून रक्ताच्या उलट्या येऊ लागले. त्यामुळे त्याला तातडीने तेथील लोकांनी एका ऊसतोडणी मजुराच्या मोटारसायकलवरून कोरेगाव येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेले.

तेथे डॉक्टरांनी तपासणी करून तो लहान मुलगा मृत्यु झाल्याचे घोषित केले. याबाबत फिर्याद मृत संकेतचे वडील कृष्णा बबन जाधव (वय- 23, रा. बोदेगाव, ता. शेवगाव, जि. नगर) यांनी येथील पोलिसात दाखल केली असून, त्यानुसार पोलिसांनी ट्रॅक्टर चालक श्री. राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A 3-year-old boy was found dead under a sugarcane tractor

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here