Home Crime News धक्कादायक! ३० वर्षीय तरुणाने केला तीन महिलांचा खून, घटनेने खळबळ

धक्कादायक! ३० वर्षीय तरुणाने केला तीन महिलांचा खून, घटनेने खळबळ

Solapur Crime News: तीन महिलांचा राहत्या घरासमोर हत्याराच्या सहायाने खून (Murder).

A 30-year-old man Murder three women incidents in Mangalvedha Taluka

सोलापूर: मंगळवेढा तालुक्यात बुधवारी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ३० वर्षीय तरुणाने  तीन महिलांचा खून केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या नंदेश्वरात दुपारी एकच्या दरम्यान अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून या महिलांचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तीन महिलांचा राहत्या घरासमोर हत्याराच्या सहायाने खून करण्यात आला. तिन्ही महिलांचे मृतदेह घरासमोर अत्यावस्थ पडली होती एका परातील तीन महिनापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे सह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होत आहेत.

या तीन महिलाच्या खुनामुळे गावावर शोककळा पसरली असून अचानक झालेल्या खूनसत्रामुळे गावात भितीचे वातावरण पसरले. त्यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत एका ३० वर्षीय तरूणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या तरूणामध्ये व एका महिलेमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या महिलेसह अन्य एका महिलेच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने त्या तरुणाने वार केल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Shocking! A 30-year-old man Murder three women incidents in Mangalvedha Taluka

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here