Home अकोले अकोलेतील घटना: प्रियकराने काढला प्रेयसीचा काटा, प्रेयसीची केली क्रूर हत्या

अकोलेतील घटना: प्रियकराने काढला प्रेयसीचा काटा, प्रेयसीची केली क्रूर हत्या

Rajur News: वासाळी येथील एका प्राथमिक शिक्षकाने प्रेमातून एका २१ वर्षीय तरुणीची क्रूर हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत तिघा आरोपींचा समावेश, राजूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.

kole Murder Case lover took out the lover's fork, brutally killed the lover

अकोले: अकोले तालुक्यातील वासाळी येथील एका प्राथमिक शिक्षकाने प्रेमातून एका २१ वर्षीय तरुणीची क्रूर हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

दत्तू धोंडू डगळे (वय 42, रा. वासाळी, ता. अकोले), मनोहर पुनाजी कोरडे (रा. नाशिक), अमोल शांताराम गोपळ (रा. वासाळी ता. अकोले) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  अकोले तालुक्यातील शेंडी येथुन 14 जानेवारी पासुन भारती दत्तु खाडे (वय 21) ही मुलगी बेपत्ता झाली होती. सदर मुलीची बेपत्ता असण्याची तक्रारही राजुर पोलिस स्टेशनला दाखल झालेली होती. सदर मुलीला नोकरीचे आमिष दाखवुन गाडीत बसवुन नेले होते. राजुर पोलिसांकडे मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे यांनी विविध प्रकारे तपासास सुरुवात केली होती.

ठिकठिकाणी जाऊन पोलिस स्टेशनला तपास केला जात होता. नंतर तांत्रिक तपासावर भर देत श्री. इंगळे यांनी तपासाला अधिक वेग दिला. तांत्रिक तपास करत असताना नाशिक येथील एका आरोपीपर्यंत राजुर पोलिसांचे पथक जाऊन धडकले. पंरतु तोपर्यंत संशयित आरोपी अमोल गोपाल याने तेथुन आपले घर सोडले होते. त्यामुळे राजुर पोलिसांना नाइलाजास्तव तेथेच थांबावे लागले. तरीही सहाय्यक पो. नि. गणेश इंगळे हार मानण्यास तयार नव्हते. तांत्रिक तपासावर भर देत संशयित आरोपी अमोल गोपाल याच्या बहिणीपर्यंत धागा गाठला. तेथेच अमोल गोपाळ हा पोलिसांना शरण आला. अमोलकडे अधिक चौकशी केली असता यामध्ये वासळी येथील एका प्राथमिक शिक्षकाचे व त्याच्या मित्राचे नाव सांगितले.

वासळी येथे दत्तु धोंडु डगळे हा प्राथमिक शिक्षक असुन त्याचे भारती दत्तु खाडे हिच्याशी प्रेमसंबंध होते. पंरतु काही कारणास्तव त्यांच्यामध्ये पुन्हा संबंध बिघडले होते. चार पाच महिण्यापुर्वी राजुर पोलिस स्टेशनला येऊन सदर प्रकरणावर पडदा पडला होता. त्यामुळे दत्तु धोंडु डगळे याचा नाईलाज झाला होता. त्याने नाशिकच्या अमोल शांताराम गोपाल या मित्राकरवी सदर मुलीच्या घरच्या मोबाईलवर फोन करुन तुमच्या मुलीला ठाण्यात एका कंपनीत नोकरी देणार , असे सांगून मनोहर पुनाजी कोरडे याला बरोबर घेत तिला नोकरीच्या नावाखाली गाडीत बसवुन आरोपींनी तिला ठाणे येथे नेले होते. तेथे त्यांच्यात काही गोष्टींवरुन वाद झाले. मुलीने नकार दिल्याने तिला ठाण्यातील शहापूर येथील साकुर्ली परिसरात असणार्या एका दगडाच्या खाणीमध्ये नेले. तेथे मोठा दगड तिच्या डोक्यात टाकून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला खाणीत फेकुन दिले.

सदर प्रेत पाण्यावर तरंगतांना आढळुन आल्यानंतर किनवली पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 13/2023 भारतीय दंड संहिता 302, 201 कलमान्वये दाखल केला होता.

दरम्यान राजुर पोलिसांनी भारती हिच्या बेपत्ता तक्रारीचा तपास पुर्ण केल्यानंतर भारतीची विल्हेवाट लावलेल्या ठिकाणी जाऊन खात्री केल्यानंतर किनवली पोलिस स्टेशनशी संपर्क साधत गुन्हा दाखल असल्याची खात्री केली होती. राजुर पोलिसांनी किनवली पोलिसांशी संपर्क केल्यानंतर किनवली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पो. नि. कमलेश बच्छाव यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपी दत्तु धोंडु डगळे, मनोहर पुनाजी कोरडे व अमोल शांताराम गोपाल यांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, पो. उपनिरीक्षक ए. जे. शेख, पो. ना. दिलीप डगळे, अशोक काळे, अशोक गाडे, साईनाथ वर्पे, विजय फटांगरे, विजय मुंडे, सुनिल ढाकणे, कैलास नेहे व रोहिणी वाडेकर यांच्या टिमने अतिशय गोपनिय पद्धतीने बेपत्ता मुलीचा तपास लावत या गुन्ह्याला वाचा फोडली. या कामगिरीबद्दल राजुर पोलिसांचे कौतुक होत आहे.

Web Title: Akole Murder Case lover took out the lover’s fork, brutally killed the lover

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here