Home जळगाव धक्कादायक ! ६५ वर्षीय वृद्धाचा पाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

धक्कादायक ! ६५ वर्षीय वृद्धाचा पाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

Breaking News | Jalgaon Crime: एका पाच वर्षीय चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने दारूच्या नशेत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना.

A 65-year-old man abused a five-year-old girl

जळगाव : रावेर तालुक्यातील एका गावात पाच वर्षीय चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने दारूच्या नशेत अत्याचार धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (ता. १८) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी संशियीत आरोपीस अटक (Arrested) केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गावातील पीडित चिमुरडी तिच्या आजीच्या घरी मागील एक महिन्यापासून राहत होती. दरम्यान, रविवारी (ता १८) दुपारी घरात कोणीही नसताना संशयित वामन बळिराम घटे (बेलदार) (वय ६५) याने या पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, संशयित हा गोलवाडे (ता. रावेर) येथील रहिवासी आहे. या प्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. त्यास रावेर न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हरिदास बोचरे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A 65-year-old man abused a five-year-old girl

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here