Home Suicide News नाशकात खळबळ! ड्युटीवर असताना पोलीस उपनिरिक्षकाची स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

नाशकात खळबळ! ड्युटीवर असताना पोलीस उपनिरिक्षकाची स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

Breaking News | Nashik Suicide: सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना.

police sub-inspector committed suicide by shooting himself in the head while on duty

नाशिक: नाशिक शहरातील अंबड पोलिस ठाण्यात आज सकाळी धक्कादायक घटना समोर आली आहे.  पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. या घटनेने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.

नजन यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे सहायक प्रशांत बच्छाव यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी की, , अशोक नजन हे सकाळी त्यांच्या कॅबिनमध्ये बसले होते. त्यावेळी अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला. यानंतर ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कॅबिनच्या दिशेने धाव घेतली. यावेळी नजन यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात एकच खळबळ माजली. या घटनेनंतर अशोक यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नजन यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: police sub-inspector committed suicide by shooting himself in the head while on duty

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here