Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन मुलीस पळविले

अहमदनगर: अल्पवयीन मुलीस पळविले

Breaking News | Ahmednagar: १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले.

A minor girl was abducted

श्रीरामपूर : शहरातील वॉर्ड क्रमांक  एकमध्ये राहणाऱ्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. मुलीच्या आईने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

अधिक माहिती अशी की, मुलीची आई एका रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून काम करते. कामावरून सायंकाळी घरी परतल्यानंतर तिला मुलगी घरात नसल्याचे दिसले. लहान मुलीला विचारले असता तिने मोठी बहीण शाळेची बॅग घेऊन बाहेर गेल्याचे सांगितले. मुलीच्या आईने परिसरात सर्वत्र व नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. मैत्रिणीकडे विचारणा केली असता काही कळाले नाही. अखेर फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दाखल केली. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: A minor girl was abducted

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here