Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग! इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

अहमदनगर ब्रेकिंग! इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

Breaking News | Ahmednagar: एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून उडी घेऊन एकाने आत्महत्या (Suicide) आत्महत्या केल्याची घटना.

Ahmednagar Suicide by jumping from a building

श्रीरामपूर : शहरातील म्हाडा कॉलनी येथील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून उडी घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 

बुधवारी सकाळी घरामध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून परदेशी नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली. घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लोणी येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. परदेशी हे मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील असून श्रीरामपूर येथे रंगकामाचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे समजू शकलेले नाही. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.

Web Title: Ahmednagar Suicide by jumping from a building

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here