Home संगमनेर संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Breaking News | Sangamner: अज्ञात वाहनाच्या धडकेत १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना. 

15-year-old boy died in a collision with an unknown vehicle

संगमनेर: संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वाहनाच्या धडकेत अर्जुन काशिनाथ केदार (वय १५, नांदुरखंदरमाळ, ता. संगमनेर) याचा मृत्यू झाला. शनिवारी (१३ एप्रिल) दुपारी ३ वाजता येठेवाडी शिवारातील रोडे वस्तीच्या रोडवर हा अपघात झाला.

अर्जुन शेतातील कांदे काढण्यासाठी मजुर बघण्याकरिता येठेवाडी येथील रोडे वस्तीवर गेला होता. अर्जुन याला अज्ञात वाहनाने धडक दिली असुन ते वाहन निघुन गेले आहे. तुमचा मुलगा आमचे वस्तीसमोर रोडच्या कडेला पडलेला आहे, अशी माहिती काशिनाथ केदार यांना गणेश रोडे यांनी फोनवरून माहिती दिली. अर्जुनला घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तो मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अर्जुनच्या शवविच्छेदनानंतर त्याच्यावर नांदुरखंदरमाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. काशिनाथ केदार यांनी बुधवारी (१७ एप्रिल) घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकावर मोटार वाहन अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिस तपास करत आहे. अर्जुनच्या अपघाती मृत्यूने नांदुरखंदरमाळच्या ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे.

Web Title: 15-year-old boy died in a collision with an unknown vehicle

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here