Home औरंगाबाद लॉजमध्ये थरार! डॉक्टर प्रेयसीच्या गळ्यावर वार, प्रियकराचाही आत्महत्येचा प्रयत्न

लॉजमध्ये थरार! डॉक्टर प्रेयसीच्या गळ्यावर वार, प्रियकराचाही आत्महत्येचा प्रयत्न

Breaking News | Chhatrapati Sambhajinagar Crime: सर्जिकल ब्लेडने डॉक्टर प्रेयसीच्या गळ्यावर वार करत प्रियकरानेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना.

Doctor stabs girlfriend's neck, boyfriend also tries to commit suicide

छत्रपती संभाजीनगर: सर्जिकल ब्लेडने डॉक्टर प्रेयसीच्या गळ्यावर वार करत प्रियकरानेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असलेल्या प्रेयसीच्या गळ्यावर तेथेच टेक्निशियन म्हणून असलेल्या प्रियकराने सर्जिकल ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका लॉजमध्ये घडली.

डॉक्टर तरुणी ही ईश्वरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये आर एम ओ आहे तर आरोपी निखिल दादाराव यादव हासुद्धा तिथेच टेक्निशियन म्हणून काम करत होता. हे दोघेही जुलै 2023 पासून एकमेकांना ओळखत होते आणि जानेवारी 2024 पासून त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.

काल दोघेही शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एका लॉजमध्ये गेले असता निखिल यादव याने सर्जिकल ब्लेडने डॉक्टर प्रेयसीच्या गळ्यावर वार केले. त्याबरोबरच त्यांनी स्वतःही गळ्यावर वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र आरडाओरडा केल्यानंतर त्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. त्याच्याविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Doctor stabs girlfriend’s neck, boyfriend also tries to commit suicide

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here