Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन मुलीचे अपहरण

अहमदनगर: अल्पवयीन मुलीचे अपहरण

Ahmednagar News: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पळवून नेल्याची घटना. (Abduction of a minor girl)

Abduction of a minor girl

राहुरी : राहुरी तालुक्यात मुलीचे अपहरण होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असताना आता आणखी एक प्रकार समोर आला आहे.  शौचालयाला जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पळवून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील खुडसरगांव परिसरात घडली.

याबाबत करण पवार याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी तिच्या आई- वडिलांसह राहते. दि. ११ रोजी दुपारी ती घरातून बाहेर पडली. बराच वेळ झाला तरी ती घरी परत आली नाही. तेव्हा तिच्या नातेवाइकांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र ती दिसून आली नाही. त्यानंतर आरोपी करण अशोक पवार (रा. खुडसरगाव) याने त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचे तिच्या नातेवाइकांना समजले. पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Web Title: Abduction of a minor girl

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here