Home नाशिक थिएटरमध्ये चित्रपट बघताना अचानकपणे दुर्दैवी घटनेत मृत्यू

थिएटरमध्ये चित्रपट बघताना अचानकपणे दुर्दैवी घटनेत मृत्यू

कॉलेज रोडवरील एका सिनेमागृहात रात्री ‘ओएमजी-२’ हा चित्रपट बघताना अचानकपणे एका ४९ वर्षीय इसमाच्या छातीत कळ निघून वेदना सुरू, शासकीय रुग्णालयात दाखल – केले; मात्र, त्यांचा मृत्यू (Death).

Sudden death in an unfortunate incident while watching a movie

नाशिक : कॉलेज रोडवरील एका सिनेमागृहात रात्री ‘ओएमजी-२’ हा चित्रपट बघताना अचानकपणे एका ४९ वर्षीय इसमाच्या छातीत कळ निघून वेदना सुरू झाल्या. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल – केले; मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

प्रमोद जुगलीला चोरडिया असे मयत इसमाचे नाव आहे. प्रमोद चोरडिया हे त्यांच्या नातेवाइकांसह कॉलेज रोडवरील सिनेमागृहात चित्रपट बघण्यासाठी गेले होते. येथील स्क्रीन -२मध्ये ते चित्रपटाचा आनंद घेत असताना अचानकपणे शुक्रवारी (दि. १८) रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास त्यांच्या छातीत वेदना सुरू झाल्या. चोरडिया खुर्चीवरच बेशुद्ध पडल्याने त्यांना अभय कोठारी यांनी जिल्हा – शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले; मात्र, उपचारादरम्यान मध्यरात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून चोरडिया यांना मयत घोषित केले.

Web Title: Sudden death in an unfortunate incident while watching a movie

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here