Breaking News | Crime : १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करुन तिच्या भावाला मारहाण केल्याची घटना.
शिंदखेडा : तालुक्यातील १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करुन तिच्या भावाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात, ता. शिंदखेडा येथील १९ वर्षीय तरुणी दि.१८ रोजी दुपारी ४.१० वाजता येथील एका कार्यालयात महिलांना मेकअप करण्यासाठी आली होती. त्यावेळी तिला नेहमी त्रास देणारा भडणे ता. शिंदखेडा येथील संशयित चेतन करनकाळ नामक तरुणाने तरुणीला बळजबरीने मोटारसायकलवर बसवून तसेच तिच्या भावाला मारहाण करून तरुणीचे अपहरण केले.
याप्रकरणी पिडीत तरुणीच्या वडिलांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित चेतन करनकाळ याच्याविरुध्द भारतीय न्याय संहीता कलम १४० (३), ११५ (२), ३५२, ३५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार करीत आहेत.
Web Title: Abduction of young woman, crime against one
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study