प्रेमास नकार दिल्याने विवाहित तरुणीचे तोंड दाबून शारीरिक अत्याचार
Rahuri | राहुरी: प्रेमास नकार व शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने २७ वर्षीय विवाहित तरुणी घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी घरात घुसला आणि त्याने विवाहित तरुणीचे तोंड दाबून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार (abuse) केल्याची घटना राहुरी शहरात ७ जून रोजी घडली.
या घटनेतील आरोपी किरण रावसाहेब फुलसौंदर हा राहुरी शहरातील तनपुरेवाडी येथे रहावयास आहे. दि. 2 जून रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास या घटनेतील विवाहित तरूणी तनपुरेवाडी रोड परिसरातील मंदिराजवळ असताना आरोपी किरण फुलसौंदर तेथे गेला आणि तिला म्हणाला, तू मला खूप आवडतेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी शारिरीक संबंध ठेव. तेव्हा विवाहित तरूणीने त्याला नकार देऊन ती तेथून निघून गेली.
त्यानंतर दि. 7 जून रोजी ती विवाहित तरूणी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी किरण फुलसौंदर तिच्या घरात घुसला. तिचे तोंड दाबून धमकी दिली. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर शारिरीक अत्याचार केला. सात ते आठ दिवसानंतर त्याने पुन्हा धमकी देऊन राहुरी बसस्थानका समोरील लॉजमध्ये तिला घेऊन गेला आणि जबरदस्तीने तिच्यावर शारिरीक अत्याचार केला. त्यानंतर 30 जून रोजी आरोपी किरण फुलसौंदर याने त्या विवाहित तरूणीच्या पतीच्या मोबाईलवर वारंवार फोन केला. तिच्या पतीने वारंवार येणार्या फोनबाबत तिला विचारणा केली. तेव्हा घडलेला सर्व प्रकार तिने तिच्या पतीला सांगितला.
त्यानंतर त्या विवाहित तरूणीने राहुरी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून आरोपी किरण रावसाहेब फुलसौंदर रा. तनपुरेवाडी, राहुरी याच्या विरोधात शारिरीक अत्याचाराचा तसेच अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपीला ताबडतोब अटक करण्यात आली आहे. अधिक तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके हे करीत आहेत.
Web Title: abuse of a married woman by refusing love