Home अकोले यावर्षी अकोले तालुक्यातील हे पहिले धरण ओव्हरफ्लो

यावर्षी अकोले तालुक्यातील हे पहिले धरण ओव्हरफ्लो

Ambit Dam Overflow today

अकोले: अकोले तालुक्यातील आंबीत धरण (Ambit Dam) ओव्हरफ्लो झाले असल्याने शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करीत आहे. घाटमाथ्यावर पावसाने जोर धरल्याने मुळा नदीच्या उगमस्थानाकडे असणारे आंबीत धरण शनिवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले असून मुळा नदी वाहू लागली आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात अकोले तालुक्यातील हे पहिले धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मुळा धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारपासून घाटमाथ्यावर पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने पावसाचा जोर वाढला. गेल्या दोन दिवसापासून अकोले तालुक्यातील घाटमाथ्यावर पाऊस सुरू आहे. घाटमाथ्यावरील ओढे-नाले वाहते झाले आहे. मुळा नदी वाहू लागली आहे. हरिश्चंद्रगडाचे परिसरांचे मोठे पाणलोट क्षेत्र मुळा नदीला लाभल्याने या भागातून पावसाचे पाणी आंबित धरणात स्थिरावले आणि शनिवारी सकाळी 7 वाजता आंबीत धरण ओसंडून वाहू लागले. 193 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आंबित धरणाच्या भिंतीवरून 200 ते 300 आजचा विसर्ग मुळा नदीपात्रात झेपावला. यामुळे मुळानदी वाहू लागली आहे. आंबित धरणातील हा प्रवाह आता पिंपळगाव खांड धरणाकडे झेपावला आहे.  भंडारदरा धरण हे काल सायंकाळपर्यंत  जवळपास २५ टक्के  भरले आहे. 

Web Title: Ambit Dam Overflow today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here