Home अहमदनगर धक्कादायक! सख्या बहिणीवर भावाकडून अत्याचार; नगरमध्ये विकृत घटना

धक्कादायक! सख्या बहिणीवर भावाकडून अत्याचार; नगरमध्ये विकृत घटना

Ahmednagar Crime News: भावानेच आपल्या सख्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याची नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

Abuse of sister by brother Paranormal events in the city

अहमदनगर: भावानेच आपल्या सख्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याची नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.  पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीतून समोर आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुलावर अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी हे मुळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका गावचे रहिवाशी असून ते सध्या नगर शहरातील एका उपनगरात पत्नी, 17 वर्षीय मुलगी व मुलासह राहतात. मुलीला गेल्या सहा वर्षापासून थायरॉईड असल्याने तिच्यावर औषध उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या तीन महिन्यापासून मुलीला मासिक पाळी न आल्याने त्यांनी तिला गुरूवारी (दि. 20) सकाळी डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता ती 20 आठवड्याची गर्भवती असल्याचे समोर आले. हे ऐकुण मुलीच्या आई- वडिलांना धक्काच बसला. त्यांनी तिला विश्‍वासात घेत विचारणा केली असता तिने सांगितलेला प्रकार गंभीर होता.

तिने तिच्या वडिलांना सांगितले, ‘मार्च महिन्यात तुम्ही आईसोबत शेतातील हरभरा काढण्यासाठी आपल्या मुळ गावी गेले होते. त्यावेळी घरी मी व भाऊ दोघेच होतो. रात्री जेवण करून मी झोपी गेले तेव्हा भावाने माझ्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध केले. त्याला विचारणा केली असता काही होत नाही, असे त्याने उत्तर दिले’, सर्व प्रकार ऐकुण मुलीच्या वडिलांना धक्काच बसला. त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Abuse of sister by brother Paranormal events in the city

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here