Home अकोले Mula Dam: मुळा धरणातील पाणी पोहोचले इतक्या टक्क्यावर

Mula Dam: मुळा धरणातील पाणी पोहोचले इतक्या टक्क्यावर

Mula Dam Water:  मुळा धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर.

water in Mula Dam has reached this percentage

अकोले: नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मुळा धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर आहे. पाणलोटात पाऊस सुरू असून काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 11848 दलघफू झाला आहे. पावसाचे प्रमाण असेच टिकून राहिल्यास तीन-चार दिवसांत हे धरण निम्मे भरेल.

हरिश्‍चंद्र गड, पाचनई, आंबितमध्ये गुरूवारी पावसाचा जोर वाढल्याने काल शुक्रवारी सकाळी कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग 7667 क्युसेक होता. त्यामुळे धरणात नवीन पाण्याची आवक होत आहे. काल सकाळी पाणीसाठा 11848 दलघफू होता. त्यात आणखी वाढ होत आहे. त्यामुळे काल या धरणातील पाणीसाठा 46 टक्क्यांवर पोहचला होता. दिवसभरात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने सायंकाळी नदीतील विसर्ग 4200 क्युसेकपर्यंत घटला होता.

SEE ALSO: PRESENT PERFECT TENSE WITH EXAMPLES

भंडारदरा पाणलोटातील गुरूवारी रात्री चेरापुंजी समजल्या जाणार्‍या घाटघर, पांजरे आणि रतनवाडी जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे काल सकाळी संपलेल्या 24 तासांत तब्बल 440 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. त्यानंतरही पाण्याची आवक सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी पाणीसाठा 8380 दलघफूवर (75.91टक्के) पोहचला होता. काल दिवसभरात पावसाचा जोर ओसरला. भंडारदरात काल दिवसभराचा पाऊस केवळ 17 मिमी नोंदवला गेला. निळवंडे धरणातही पाण्याची आवक सुरू असून 8330 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल दुपारी पाणीसठा 3000 दलघफूवर गेला होता.

गेल्या २४ तासांत पावसाची नोंद: भंडारदरा 97, घाटघर 116, पांजरे 50, रतनवाडी 130, वाकी 67 मिमी.

Web Title: water in Mula Dam has reached this percentage

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here