संगमनेर: लग्नाचे अमिष दाखवून विधवा महिलेवर अत्याचार
Sangamner Crime: विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर अत्याचार (Abuse) करून वेळोवेळी तिच्याकडून सुमारे ३० लाख रुपये घेऊन ते परत देण्यास नकार तसेच विधवेच्या मुलीस मारून टाकण्याची धमकी दिली.
संगमनेर: विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर अत्याचार करून वेळोवेळी तिच्याकडून सुमारे ३० लाख रुपये घेऊन ते परत देण्यास नकार देत विधवेच्या मुलीस मारून टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी समोर आला.
सप्टेंबर २०२० चे १ मे २०२३ या काळात संगमनेर आणि शिर्डीमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या संदर्भात संबंधित महिलेने शहर पोलीस ठाण्यात बुधवारी दिलेल्या फिर्यादीवरून आळंदी (जि. पुणे) येथील योगेश सुभाष टोपेकर यांच्या विरोधात अत्याचार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
योगेश टोपेकर याची कोविड काळामध्ये फेसबुकवर पीडित महिलेची ओळख झाली होती. फेसबुकवर झालेल्या संभाषणातून ती विधवा असल्याची माहिती टोपेकर याला मिळाल्यानंतर त्याने या महिलेशी वेळोवेळी फोनवरून संपर्क साधत तिच्याशी जवळीक संपर्क साधत तिच्याशी जवळीक वाढविली. ओळखीतूनच त्याचे या महिलेच्या घरी येणे जाणे सुरू झाले. मी तुझ्याबरोबर लग्न करतो, असे आमिष दाखवत त्याने तिच्या इच्छे विरुद्ध तिच्यावर संगमनेर येथील तिच्या राहत्या घरी आणि शिर्डीतील हॉटेलमध्ये वारंवार अत्याचार
तसेच या दरम्यानच्या काळात त्याने तिच्याकडून ३० लाख ३७ हजार ०७९ रुपये फोन पे, गुगल पेद्वारे ऑनलाईन घेतले. पीडित महिलेने विश्वासापोटी त्याला वेळोवेळी पैसे दिले. महिलेने दिलेल्या पैशाची त्याच्याकडे मागणी सुरू केली असता त्याने मी तुझ्यासोबत लग्न करतो. पैशाबद्दल बोलू नकोस, नाहीतर तुझ्या मुलीस मारून टाकेल, असा दम देखील पीडित महिलेला दिला. पैसे परत मिळावे यासाठी पीडित महिलेने वारंवार योगेश टोपेकर याच्याशी संपर्क साधला असता आरोपी टोपेकर याने त्याचा मोबाईल फोन बंद करून टाकला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदर महिलेने बुधवारी संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठून आरोपीने आपली आर्थिक फसवणूक केल्याचे तसेच आपल्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी एकटेपणाचा फायदा घेऊन अत्याचार केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार तपास करत आहेत.
Web Title: Abuse of widow woman by lure of marriage
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App