Home क्राईम नांदेड हादरले ! बेपत्ता प्रेमीयुगलाचे मृतदेह नदीकिनारी सापडले

नांदेड हादरले ! बेपत्ता प्रेमीयुगलाचे मृतदेह नदीकिनारी सापडले

Nanded Crime: नांदेडच्या मुदखेड तालुक्यात बेपत्ता प्रेमी युगलाचा मृतदेह (Dead Body) सापडल्याने खळबळ उडाली.

Dead Bodies of the missing couple were found on the banks of the river

नांदेड: जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रेमीयुगलाचा मृतदेह मुगट गावातील गोदावरी नदीच्या किनारी आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या दोघांच्या प्रेमाला घरच्यांना विरोध असल्याची माहिती मिळत आहे.

विकास धोंडिबा तुपेकर (वय २२) आणि ऋतुजा बालाजी गजले ( वय १८) असे या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. मृत विकास तुपेकर आणि ऋतुजा गजले हे दोघे मुगट गावात शेजारी राहतात. दरम्यान, या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, याची माहिती घरच्यांना मिळाली. दोघांच्याही घरच्यांचा त्याच्या प्रेमाला विरोध होता. यावरून दोघांनाही त्यांच्या कुटुंबीयांनी मारहाण केली होती. असे असले तरी दोघांनी त्यांच्या नात्यात दुरावा येऊ दिला नाही. दरम्यान, पाच दिवसांपूर्वी हे दोघे बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घरचे घेत होते. हे दोघेही गावात दिसत नसल्याने चर्चा सुरू झाल्या होत्या.

दरम्यान, २३ मे रोजी सायंकाळी या दोघांचाही मृतदेह गावातील गोदावरी नदीच्या काठावर आढळला. दोघांचेही मृतदेह हे कुजले होते. त्यांचा चेहरा ओळखू येत नव्हता. ही घटना गावात समजताच खळबळ उडाली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला असून या प्रकरणी पोलिसांनी आकास्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान त्यांनी आत्महत्या केली त्यांची हत्या करण्यात आली आहे या बाबत गावात उलट सुटल चर्चा सुरू आहेत. याबाबत पोलीस देखील अधिक तपास करीत आहे.

Web Title: Dead Bodies of the missing couple were found on the banks of the river

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here