Home अहमदनगर Ahmednagar: महिलेवर अत्याचार, तू जर लग्नाचा विषय काढला तर…..

Ahmednagar: महिलेवर अत्याचार, तू जर लग्नाचा विषय काढला तर…..

Ahmednagar News: लग्न करण्यास टाळाटाळ करत होता. जिवे मारण्याची धमकी देत त्याने शरीरसंबंध ठेवले.

abused women, if you bring up the topic of marriage

अहमदनगर:  प्रेमात लग्न करण्यास टाळाटाळ करत तू जर लग्नाचा विषय काढला तर जिवे ठार मारीन, अशी धमकी देत २७ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना नगरमध्ये घडली. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राजू मुस्ताक शेख (रा. वाघगल्ली, नगर) याच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नगरमधील एका २७ वर्षीय महिलेचे पतीसोबत पटत नसल्याने ती स्वतंत्र राहत होती. तिची ओळख राजू शेख याच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. महिलेने आरोपीकडे वेळावेळी लग्नाचा आग्रह धरला; परंतु लग्न करण्यास टाळाटाळ करत होता. जिवे मारण्याची धमकी देत त्याने शरीरसंबंध ठेवले. एक दिवस महिलने त्यास प्रतिकार करत लग्न करण्याची मागणी केली. त्यावर त्याने ‘तू जर लग्नाचा विषय काढला तर तुला जिवे ठार मारून टाकीन, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: abused women, if you bring up the topic of marriage

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here