Home अहमदनगर अहमदनगर: अनैतिक संबंधातूनच टपरी मालकाचा खून

अहमदनगर: अनैतिक संबंधातूनच टपरी मालकाचा खून

Ahmednagar Murder Case: अनैतिक संबंधातुन संगनमताने खुन केल्याची कबुली.

Tapri owner's murder due to immoral relationship

श्रीगोंदा | Shrigonda: नगर-दौंड रस्त्यावरील शिरसगाव फाट्याजवळ (ता. श्रीगोंदा) दशरथ शिर्के या टपरी मालकाच्या खून प्रकरणाचा श्रीगोंदा पोलिसांनी छडा लावला आहे. तालुक्यातील बाबर्डी येथील एका 65 वर्षीय व्यक्तीचा झालेला खून अनैतिक सबंधातून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. एका महिलेशी संबंध असल्याच्या कारणावरून फिर्यादीच्या मावस भावाने काकाच्या डोक्यात लाकडाचे घाव घालून खून केला.

याप्रकरणी मुख्य आरोपी अमोल कुरूमकर व अक्षय वागस्कर (दोघेही रा. वडाळी, ता. श्रीगोंदा) या दोघांना जेरबंद केले आहे.

अमोल कुरूमकर याचे एका महिलेशी अनैतिक दोनच्या संबंध असल्याचे दशरथ शिर्के यांना समजले होते. याचा राग मनात होता. अमोल कुरूमकर व त्याचा मित्र अक्षय वागस्कर हे श्रीगोंद्याच्या यात्रेत आले, पाळण्यात बसले, मद्य सेवन केले केला. आणि शिरसगाव फाटा येथे एका दुचाकीने गेले. शुक्रवारी (दि. ३) रात्री २ वाजेच्या सुमारास टपरीचा विद्युतपुरवठा आकडा काढून खंडित केला. अमोल कुरूमकर याने दशरथ शिर्के यांच्या डोक्यात बांबूचे चार-पाच घाव घातले आणि काकाचा खून केला

श्रीगोंदा पोलिसांनी योग्य दिशेने तपास करत सदरप्रकरण अनैतिक संबंधातुन अमोल कुरुमकर आणि अक्षय वागस्कर या दोन जणांनी हा खून केल्याचे उघड केले. पोलीसांनी तपासाचे सूत्र फिरवत तांत्रीक तपासाच्या मदतीने व गुप्त बातमीदाराकडून मिळाल्या माहिती नुसार अमोल कुरुमकर व अक्षय वागस्कर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी अनैतिक संबंधातुन संगनमताने दशरथ शिर्के यांचा खुन केल्याची कबुली दिली आहे.

Web Title: Tapri owner’s murder due to immoral relationship

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here