Home महाराष्ट्र महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता: पंजाबराव डंख यांचा हवामान अंदाज

महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता: पंजाबराव डंख यांचा हवामान अंदाज

Panjabrao Dakh: ८ मार्च नंतर उघडीप आणि  13 मार्च नंतर पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल होणार असून 14 मार्च ते 20 मार्च दरम्यान महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता यांनी वर्तवली आहे.

Chance of heavy rains in Maharashtra Punjabrao Dankh Weather Update

Weather Update: सध्या महाराष्ट्रात वातावरणात मोठा बदल झाला आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. विशेषता उत्तर महाराष्ट्र म्हणजेच अहमदनगर नासिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेली पिके प्रभावित होत असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

काल धुळे जिल्ह्यात तर अक्षरशः एक तास गारपीट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. निश्चितच गारपीट झाल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. सध्या कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे अन काही ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष, डाळिंब, केळी, पपई या पिकांना आणि रब्बी हंगामातील गहू, हरभरा यांसारख्या काढणी योग्य पिकांना देखील फटका बसण्याचा अंदाज तज्ञ लोकांनी वर्तवला आहे.

विशेष बाब अशी की, या पावसाबाबत हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी 28 फेब्रुवारी रोजी अंदाज वर्तवला होता. यामुळे पंजाब रावांचा अंदाज पुन्हा एकदा काळ्या दगडावरची पांढरी रेष ठरला असल्याचं मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. अशातच मात्र पंजाबरावांनी पुन्हा एक सुधारित हवामान अंदाज काल सार्वजनिक केला आहे. डखं यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार सध्या पडत असलेला पाऊस हा आठ मार्च पर्यंत कायम राहणार आहे. ८ मार्चपर्यंत राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

मात्र तदनंतर पावसाची उघडीप राहणार आहे. 9 मार्च ते 13 मार्च पर्यंत महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहील असे मत डखं यांनी व्यक्त केल आहे. यामुळे या उघडीप असलेल्या काळात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची लवकरात लवकर काढणी करून त्या पिकांची मळणी करून सुरक्षित ठिकाणी त्यांची साठवणूक करणे अपेक्षित आहे.

कारण की 13 मार्च नंतर पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल होणार असून 14 मार्च ते 20 मार्च दरम्यान महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता यांनी वर्तवली आहे. या कालावधीत कोसळणारा पाऊस हा राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात कोसळेल मात्र कोणत्या जिल्ह्यात किंवा भागात पाऊस पडेल याबाबत अद्याप डख यांनी स्पष्ट केलेले नाही. परंतु लवकरच याबाबत देखील डखं सुधारित हवामान अंदाज जारी करणार आहेत.

Web Title: Chance of heavy rains in Maharashtra Punjabrao Dankh Weather Update

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here