Home Accident News Accident: मालट्रक व आयशर टेम्पो यांच्यात अपघात, एक ठार

Accident: मालट्रक व आयशर टेम्पो यांच्यात अपघात, एक ठार

Accident between Maltruck and Eicher Tempo, one killed

Ahmednagar | अहमदनगर: बाबुर्डी बेंद गावाजवळ असलेल्या घोसपुरी फाट्याजवळ मालट्रक व आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषणं अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. या अपघातात नगरच्या सारसनगर भागात राहणाऱ्या टेम्पो चालकाचा मृत्यू झाला आहे.  सोमवारी रात्री हा अपघात घडला. सुदाम भागवत खेडकर वय ३२ रा. सारसनगर या टेम्पो चालकाचा मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, खेडकर हे त्यांचा आयशर टेम्पो घेऊन दौंडकडून नगरच्या दिशेने येत असताना नगरहून दौंडच्या दिशेने जाणार्‍या मालट्रकची बाबुर्डी बेंद गावाजवळ असलेल्या घोसपुरी फाट्यासमोर त्यांच्या टेम्पोला समोरून जोराची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यावेळी मोठा आवाज झाला. या आवाजाने जवळच असलेल्या हॉटेलमधील, पेट्रोल पंपावरील नागरिक अपघातस्थळी आले.

अपघातात दोन्ही वाहने एकमेकांत  घुसलेली होती. स्थानिक नागरिकांनी जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करत गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या टेम्पो चालक खेडकर यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नगर मधील खाजगी रुग्णालयात हलविले. मात्र, रुग्णालयात दाखल करत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Accident between Maltruck and Eicher Tempo, one killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here