Home संगमनेर पुणे संगमनेर नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी ३० हेक्टर भूसंपादन

पुणे संगमनेर नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी ३० हेक्टर भूसंपादन

Acquisition of 30 hectares of land for Pune Sangamner Nashik Semi High-Speed ​​Railway update News

मुंबई: पुणे संगमनेर नाशिक मार्गावर सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला असून या प्रकल्पासाठी आवश्यक १,४५० हेक्टर जागा संपादन करण्यात येणार आहे. यापैकी ३० हेक्टर  खासगी जागा संपादन करण्यात आल्याची माहिती  महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमआरआयडीसीएल) देण्यात आली. तसेच सरकारी आणि वन जमीन संपादनाचीही प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, निती आयोगाच्या मंजुरीनंतर हा प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे सादर करण्यात आला आहे. (Acquisition of 30 hectares of land for Pune Sangamner Nashik Semi High Speed ​​Railway)

पुणे – नाशिक असा थेट मार्ग नसल्याने पुणे किंवा नाशिक गाठण्यासाठी मुंबईला येऊन रेल्वे पकडावी लागते. त्यामुळे प्रवासासाठी सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. प्रवास वेळ कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सेमी हायस्पीड संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. ही मार्गिका पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतून जाणार आहे. त्यामुळे या तिनही जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. तसेच शेतकर्‍यांचा शेतमाल ने-आण करण्याची मोठी सविधा निर्माण होणार आहे.

त्यासाठी 102 गावांमधील एक हजार 450 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. भूसंपादन आणि संरेखनासाठी संयुक्त मोजमाप सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यामध्ये सरकारी आणि वन जमिनीचाही समावेश आहे. आतापर्यंत 30 हेक्टर खासगी जागा संपादित करण्यात आली असून ही प्रक्रिया जिल्हाधिकार्‍यांमार्फत राबविली जात आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांना मोबदलाही देण्यात येत आहे. एप्रिलमध्ये या प्रकल्पाला निती आयोगाने मंजुरी दिली आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळाकडून लवकरच अंतिम मंजुरीही मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Acquisition of 30 hectares of land for Pune Sangamner Nashik Semi-High-Speed ​​Railway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here