Home अहमदनगर घराच्या पत्र्यास विद्युत प्रवाह उतरल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

घराच्या पत्र्यास विद्युत प्रवाह उतरल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

12-year-old boy dies after electric shock

Shrirampur | श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरात भीमनगर भागात एका घराच्या पत्र्यास विद्युत प्रवाह उतरल्याने त्या पत्र्यास हातचा धक्का (electric shock) लागून एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

श्रीरामपूर शहरातील भीमनगर भागातील अनेक घरांवरुन विद्युत तारा गेल्या आहेत. याबाबत या भागातील नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे तक्रारी केल्या होत्या मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले. या भागातील एका पत्र्याच्या घरावर लोंबकळलेली तारेचा स्पर्श झाल्याने या पत्र्यात विद्युत प्रवाह उतरला. या घरातील 12 वर्षीय ओम अढांगळे याचा हात पत्र्यास लागल्याने तो जागीच कोसळला.

यावेळी आरपीआयचे सुभाष त्रिभूवन यांनी तातडीने वीज वितरणच्या अधिकार्‍यांना या भागातील विद्युत प्रवाह बंद करण्यास सांगितले. त्यानंतर या भागातील विद्युत प्रवाह बंद करुन त्या मुलास बाजुला केले. त्याच्या नातेवाईकांनी व शेजारी राहणार्‍या नागरिकांनी त्यास तातडीने साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाला असल्याचे तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

Web Title: 12-year-old boy dies after electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here