Home जळगाव Accident | ट्रकची दोन वाहनांना धडक, भीषण अपघातात पाच जण ठार

Accident | ट्रकची दोन वाहनांना धडक, भीषण अपघातात पाच जण ठार

truck hit two vehicles, killing five people in a horrific accident

Jalgaon | जळगाव: भरधाव वेगात येत असणाऱ्या ट्रकने बकऱ्या घेऊन जात असलेल्या वाहनाला जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे.या अपघातात (Accident) पाच जण ठार झाले तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली. नशिराबाद टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाजवळ आज सकाळी ही घटना घडली आहे.

जळगाव आणि नशिराबाद येथून बकऱ्या भरून पीकअप गाडी (क्र. एमएच ४३, एडी १०५१) फैजपूर येथे बाजार असल्याने निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याच्या पुढे असणाऱ्या उड्डाणपुलाजवळ भुसावळकडून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने (क्र. एमएच ०९, एचजी ९५२१) जोरदार धडक दिली.

यानंतर हीच ट्रक अजून एका वाहनाला धडकली. या भीषण तिहेरी अपघातात (Accident) पाच जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमीवर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Web Title: truck hit two vehicles, killing five people in a horrific accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here