Home Accident News अकोले: रस्त्यावर रोलर पलटी होऊन चालकाचा मृत्यू

अकोले: रस्त्यावर रोलर पलटी होऊन चालकाचा मृत्यू

Akole Accident: रस्त्याचे काम सुरु असतांना रोलर पलटी होवून रोलर खाली दबून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना.

Accident Driver dies after roller overturns on road

कोतूळ: अकोले तालुक्यातील संगमनेर- कोतुळ तोलारखिंड या रस्त्याचे काम सुरु असतांना रोलर पलटी होवून रोलर खाली दबून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रामदेव गाज मिस्त्री (वय ४८, रा. मस्केडीह, ता. चलकुसा, हजारीबाग (बरकथा झारखंड) असे रोलर चालकाचे नाव आहे.

कोतुळ – तोलार खिंड रस्ता सुधारणेचे काम सुरू असताना रोड रोलर मागे घेताना रस्त्याचे कडेला पलटी होवुन चालकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत बिरंदर कुमार भागीरथ मिस्त्री (वय ४७, धंदा – जेसीबी मशिन ऑपरेटर, रा. मस्केडीह, ता. चलकुसा जि. हजारीबाग ( बरकथा झारखंड) हल्ली राहणार निमगावपागा, ता. संगमनेर) यांनी अकोले पोलीस ठाण्यास खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर १०२/२०२३ नुसार नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक अनिल जाधव हे करत आहे.

Web Title: Accident Driver dies after roller overturns on road

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here