Sangamner Taluka Grampanchayat Election Result: संगमनेर तालुक्यात आ. बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व कायम.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गुंजाळ वाडी अश्वी बुद्रुक व पिंपळगाव कोझिरा या तीन ग्रामपंचायती माजी महसूल मंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या गटाकडे आल्या आहेत.
शिर्डी मतदारसंघातील आश्वी खुर्द आणि पठार भागातील घारगाव ग्रामपंचायत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाकडे आले आहेत. बिनविरोध झालेल्या दोन ग्रामपंचायती थोरात गटाकडे आल्या आहेत. संगमनेर तालुक्यात आ. बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व कायम आहे.
गुंजाळवाडी ग्रामपंचायत
संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गुंजाळवाडी ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने जनतेतून निवडून येणाऱ्या सरपंच पदाचे उमेदवार नरेंद्र उर्फ अमोल संभाजी गुंजाळ हे विजयी झाले आहे तर त्यांच्या शेतकरी विकास मंडळाचे सदस्य पदाचे सर्व उमेदवार विजयी झाले आहे. मतदारांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना नाकारत पुन्हा एकदा काँग्रेसच्या हाती एक हाती सत्ता दिली आहे आणि भाजपच्या सर्व उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले.
घारगाव ग्रामपंचायत
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर यांचे बंधू आणि माजी सरपंच अर्चना आहेर यांचे पती नितीन म्हातारबा आहेर हे विजयी झाले आहे तर त्यांच्याच गटाच्या सदस्य पदाच्या सर्व जागा विजयी झाल्या आहेत.
पिंपळगाव कोझिरा ग्रामपंचायत
संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोझिरा ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार सह सर्व सदस्य पदाचे उमेदवार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ बाळासाहेब थोरात यांच्याच गटाचे आले आहेत तर विरोधी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना खातेही उघडता आले नाही.
आश्वी खुर्द ग्रामपंचायत
शिर्डी मतदार संघातील आश्वी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाच्या सरपंच पदाच्या उमेदवार अलका बापूसाहेब गायकवाड यांच्यासह १० सदस्य निवडून आले आहे तर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांना अवघी एका जागावर समाधान मानावे लागले आहे.
आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत
आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाचे रवींद्र सुभाष बर्डे यांचा पराभव करत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाचे सरपंच पदाचे उमेदवार नामदेव किसन शिंदे हे अवघ्या १२ मताने विजयी झाले आहे तर सदस्य पदाच्या निवडणुकीत १५ जागांपैकी १० जागा आमदार थोरात गटाला मिळाल्या तर अवघ्या ५ जागांवर ना विखे गटाला समाधान मानावे लागले.
Web Title: Sangamner Taluka Grampanchayat Election Result
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App