Home Accident News धक्कादायक: घरात गॅसचा स्फोट झाल्याने तिघे जण गंभीर जखमी

धक्कादायक: घरात गॅसचा स्फोट झाल्याने तिघे जण गंभीर जखमी

Accident gas explosion in the house seriously injured three people

कोपरगाव | Accident: कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील कासली फाट्या जवळ गॅस गोदामा नजीकच्या एका घरात गॅसचा स्फोट झाल्याने तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या दुर्घटनेत महिला रंजना सोमनाथ कवडे रा. संवत्सर व महिलेचा पती सोमनाथ कवडे, एक लहान मुलगा असे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत, या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यात संवत्सर शिवारात एच.पी. कंपनीची बाबासाहेब परजणे यांचे मालकीची गोपाल कृष्ण गॅस एजन्सी आहे.

या गॅस कंपनीचे गोडाऊन कासली रस्त्यालगत आहे. गॅस कंपनीचे राखण करण्यासाठी सोमनाथ कवडे या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सोमनाथ कवडे व त्यांची पत्नी रंजना कवडे हे काही कामासाठी बाहेर गेले असता कवडे यांच्या मुलाकडून स्वयंपाक घरातील गॅस चालू राहिल्याने गॅस संपूर्ण घरात पसरला गेला.

आई व वडील हे घरी आले असता रंजना यांनी गॅस चालू केला असता मोठा स्फोट झाला त्यात रंजना कवडे या 60 टक्के तर सोमनाथ कवडे हे 10 टक्के तर एक मूल काही प्रमाणात भाजले आहे.  लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींना ग्रामस्थांनी उपचारासाठी दाखल केले आहे.

Web Title: Kopargaon News Accident gas explosion in the house seriously injured three people

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here