Home अहमदनगर संगमनेर: छोटा पिकअप आणि मोटारसायकलचा भीषण अपघात

संगमनेर: छोटा पिकअप आणि मोटारसायकलचा भीषण अपघात

Sangamner Accident News: पानोडीतील वळणदार घाटात छोटा पिकअप आणि मोटारसायकलचा भीषण अपघात, अपघातात एकजण गंभीर जखमी, चालक फरार.

accident involving a small pickup and a motorcycle

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पूर्व व पठार भागाला जोडणारा आश्वी- साकूर मार्गावरील पानोडीतील वळणदार घाटात छोटा पिकअप आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. यामध्ये मोटार सायकलस्वार गंभीररित्या जखमी झाला. त्याला पुढील उपचारा करिता प्रवरा ग्रामीण रग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास प्रणव दिनकर शिंदे (वय ४०) हे वरवंडीच्या दिशेने मोटा मायकलवरून जात होते, त्यावेळी छोटा पिकअप आश्वी- पानोडीच्या दिशेने जात असताना ठाकरवाडी रस्त्यासमोरील वळणावर भीषण अपघात झाला. यात मोटर सायकलस्वार प्रणव दिनकर शिंदे गंभीररित्या जखमी झाला. प्रणव शिंदे यांच्या डोक्याला, तोडाला मार लागला असून गाडीच्या काचा फुटल्याने काचाही तोडाला लागल्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसले. त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पीकअप ही अज्ञात मालकीची असून ड्रायव्हर पिकअप जागेवरच सोडून फरार झाला. चालकाविरोधात फिर्याद दाखल झाली असून पुढील तपास आश्वी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Web Title: accident involving a small pickup and a motorcycle

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here