राहुरी: सरपंच पतीकडून तरुणाला मारहाण
Ahmednagar News | Rahuri: प्रश्न विचारण्याच्या रागातून गावातील एका तरुणाला एकाने शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना.
राहुरी: राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी येथे विकास कामांबाबत व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रश्न विचारणाऱ्या गावातील एका तरुणाला एकाने शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून भारत सीताराम रोकडे (रा. दरडगाव थडी) या सरपंच पतीविरोधात राहुरी पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. सदरील घटना रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. दारकू काशिनाथ रोकडे (वय २५, रा. दरडगाव थडी) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तु व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर विकास कामाबाबत का विचारतो, तुझा अधिकार काय, असे म्हणून मला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पुन्हा विकास कामांबाबत विचारणा केली तर तुला जिवेच मारुन टाकू, अशी धमकी दिली, त्यानुसार दारकू रोकडे यांच्या फिर्यादीवरून सरपंच पती भारत रोकडे यांच्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३२३, ५०४, ५०६ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस रामनाथ सानप करीत आहेत. गावाच्या विकासा बाबत सोशल माध्यमांवर प्रश्न विचारल्याच्या रागातून ग्रामस्थ तरुणाला मारहाण करणे, हा अतिशय लज्जास्पद प्रकार असून सरपंच पतीने गाव विकासात लुडबुड करू नये, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
राहुरी तालुक्यातील अनेक गावांतील ग्रामपंचायतींमध्ये महिला आरक्षणामुळे सरपंचपदावर आरूढ झाल्या आहेत. परंतु महिला सरपंचांच्या कारभारात पतींचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. सरकारने हे रोखण्यासाठी कायद्याचा बडगा उगारला असूनही पडद्याआडून सरपंच पती ग्रामपंचायतींचा कारभार चालवत असल्याचे चित्र दिसत आहे.
Web Title: Sarpanch husband beating young man Crime Filed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App