Home अहमदनगर अहमदनगर: भरधाव कारने मायलेकींना उडवले ! मुलीचा मृत्यू , आरोपीला अटक करेपर्यंत...

अहमदनगर: भरधाव कारने मायलेकींना उडवले ! मुलीचा मृत्यू , आरोपीला अटक करेपर्यंत अंत्यसंस्कार करण्यास नकार

Breaking News | Ahmednagar: मोटारसायकलवर चाललेल्या मायलेकींना धडक दिल्याने अपघातात मुलीचा जागीच मृत्यू.

Accident Mileki was blown away by a speeding car! Death of a girl

पारनेर: मोटारसायकलवर चाललेल्या मायलेकींना धडक दिल्याने यातील मुलगी प्रतीक्षा सोनवणे हिचा जागीच मृत्यू झाला तर तिची आई जखमी झाली आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पारनेर-बेल्हे रोडवर देवीभोयरे फाट्यानेजीक डेअरीजवळ झाला.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसारः मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पारनेर – बेल्हे रोडवर देवीभोयरे फाट्यानजीक डेअरीजवळ एका पांढऱ्या रंगाच्या कारने मयत प्रतीक्षा सोनवणे हिच्या बजाज कंपनीच्या बॉक्सर मोटारसायकल क. (एम एच 16 पी. ३३९८), हिला समोरून जोरात धडक दिली.

यामध्ये प्रतीक्षा गोरख सोनवणे (वय २३), रा. पुणेवाडी, ता. पारनेर ही गंभीर जखमी झाली, तिला उपचाराकरता पारनेर येथे ग्रामीण रुग्णालयात आणले असता, तिला मयत घोषित करण्यात आले तर प्रतीक्षा हिची आई (नाव समजले नाही) गंभीर जखमी झाली.

दरम्यान, धडक देणारा कारचालक मदत न करता पळून गेल्याने मयत प्रतीक्षा सोनवणे यांच्या नातेवाईकांसह पुणेवाडी गावातील कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला. मयत प्रतीक्षा सोनवणे हिची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला, नातेवाईकांनी पारनेर पोलीस स्टेशन येथे आधी आरोपींना अटक करा, मगच आम्ही अंत्यसंस्कार करू असा पवित्रा घेतला.

Web Title: Accident Mileki was blown away by a speeding car! Death of a girl

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here